दापोडीतून पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा जप्त; दोघांना अटक

510

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – दापोडी येथे फळ विकत घेऊन फळ विक्रेत्याला पाचशे रुपयांची नकली नोट दिल्याने भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या एकूण सहा नकली नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.१०) दापोडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडे आणखी नकली नोटा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी सोमवारी दापोडी येथील एका फळविक्रेत्याकडे फळ घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी फळविक्रेत्याकडून ५० रुपयांची फळे घेतली आणि त्याला ५०० रुपयांची नोट दिली. नोट पाहून फळविक्रेत्याला ती नोट नकली असल्याचे समजले. त्याने त्वरीत भोसरी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही आरोपींची झडती घेतली असता, दोन्ही आरोपींकडून एकूण पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. तसेच हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.