दापोडीतील हॅरीस ब्रिजजवळील उड्डाणपुलाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

171

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते खडकीला जोडणाऱ्या हॅरीस ब्रिजजवळ नदीवर पुण्याकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले.

या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यामुळे हॅरीस ब्रिजजवळ सीएमईपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, पुणे महापालिकेच्या नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक विजय लांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत आदी उपस्थित होते.