दापोडीतील बुध्द विहार येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

157

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – दापोडीतील बुध्द विहार येथे बुद्ध पौर्णिमा आज (शनिवार) उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अनुयायींनी अभिवादन केले.

वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. शांतीचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा त्यांच्या अनुयायांसाठी  सर्वात मोठ्या उत्सवासारखी असते.

जगातील सर्व दुःख संपवण्यासाठी गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले.  दुःखाचे मूळ नाहीसे करण्याचा मार्ग व ज्ञानप्राप्ती झाल्याने वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी  करण्यात येते.