‘दादागिरी नही चलेगी, नही चलेगी…’- विरोधकांची सभागृहात जोरदार घोषणाबाजी

72

मुंबई, दि.३० (पीसीबी)- विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असताना ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

नव्या अधिवेशनाची सुरुवात ‘वंदे मातरम’ ने व्हायला हवे होते. हे अधिवेशन नियमाला धरुन नाही. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झाले म्हणजे अधिवेशन स्थगित झाले. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो, अशा शब्दात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले.

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा आहे. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहत आहेत.