दहावी-बारावी निकालाबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या…

1

हिंगोली, दि. १० (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. हिंगोली येथे आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आज आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही वर्गाचे निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आयसीएसई बोर्डाच्या मुलांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या.

आज आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर
आयसीएसई (ICSE) बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल आज घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवारी 10 जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे. आयसीएसई कडून result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

कसा बघायचा निकाल
• ICSE चा निकाल आज दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी
• https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या.
• बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा
• तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा. त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा
• Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल
• इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड

WhatsAppShare