दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार

71

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) जाहीर करण्यात येणार  आहे. दहावीचा निकाल दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.

दहावीचा निकाल शुक्रवारी  दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा  निकाल पाहता येईल, अशी माहिती    शकुंतला काळे यांनी दिली.