दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

32

पुणे, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.  राज्याचा निकाल यंदा ८९.४१ टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.९७ टक्के इतका लागला आहे. तर ८७.२७ टक्के मुले पास झाली.

कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९६ टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५.९७ टक्के इतका लागला.