दहशतवादी कारवाया थांबवा, नाहीतर पाणी बंद करू; नितीन गडकरींचा पाकिस्तानला इशारा

147

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) –  पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबविल्या नाहीतर, भारताकडून सिंधू जल करार मोडून काढला जाईल, आणि पाकिस्तानचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.  

गडकरी म्हणाले की, सिंधू जल करारामध्ये अनेक अटी  घालण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये बंधुत्व वाढावे, शांता प्रस्थापित व्हावी आणि सहकार्य वाढवणे हे या करारामागचे उद्दिष्ट होते. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.

दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान आम्हाला सहकार्य करत नाहीत,  त्याऐवजी आम्हाला बॉम्ब मिळत आहेत. आमच्या देशावर दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे आम्ही सिंधू कराराचे पालन करण्याचे कोणतेही कारण  शिल्लक राहत  नाही.  जल करार मोडून आम्ही सिंधू नदीचे पाणी आमच्या राज्यांमध्ये थांबवू, असेही गडकरी यांनी सांगितले.