दशरथ शेट्टी यांच्या वाढदिवसानिमीत्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन

111

देहूरोड, दि.७ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्रराज्य संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी यांच्या वाढदिवसानिमीत्ताने  देहूरोड येथे गुरूवार दि.६ रोजी सकाळी १० ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत त्रिशूळ इमारतीच्या तळमजल्यावर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  दशरथ शेट्टी आणि किरण गवळी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाण पत्र व भेट वस्तू  देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानव अधार सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जॉर्ज दास, किरण गवळी, देहूरोड शहर अध्यक्ष संतोष दूधघागरे, मनसेचे व संस्थेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते