दत्तगड येथे गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

59

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चिंचवड येथील गरवारे वॉल रोप्स लिमिटेड या कंपनीतील गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने ‘जागतिक पर्यावरण दिन’ या दिवसाचे औचित्य साधून दिघी येथील दत्तगड येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाम कुंभार, जयवंत खाटपे, राजू आढाव, काळूराम कुंभार, विलास पाटील, शेखर गाडे, सतीश तारू, संजय पाटील, मल्लाप्पा बिरादार, आरुष पाटील आदी उपस्थित होते.

संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे प्रदूषण..आपल्या देशात,आपल्या शहरात आपल्याला अगदी जवळून याची दाहकता जाणवू लागली आहे..वाढते तापमान,कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण ही त्याचीच फळे आहेत.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता वृक्षारोपण करणे हाच यावरील उत्तम पर्याय आहे. म्हणून प्रत्येकांनी एक तरी झाड लावणे व त्याचे संगोपन करणे… व येणाऱ्या भावी पिढीसाठी प्रदूषण मुक्त शहर व प्रदूषण मुक्त भारत निर्माण करणे, हे आज आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच विचाराने प्रेरित होऊन गरवारे निसर्गप्रेमी ग्रुप हा उपक्रम राबवला. यासाठी कंपनी व्यवस्थापनातील विलास आरेकर, सुधीर राणे व अमित देशमुख यांचे सहकार्य लाभले.