दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ प्रथम

855

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डी गावठाण येथील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेचा निकाल आज (सोमवार) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना गुरूवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रोख बक्षिस आणि पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२०१७ च्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डी गावठाण येथील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळवित ५१ हजाराचे रोख पारितोषिक पटकाविले आहे. तर भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाने व्दितीय क्रमांकासह ४५ हजार रोख पारितोषिक पटकावले आहे. चिंचवडमधील एसकेएफ गणेशोत्सव मंडळानेृ तृतीय क्रमांक मिळविला आहे. निगडी गावठाण येथील जय बजरंग तरूण मंडळाने चौथा, तर खंडोबा मित्र मंडळाने पाचवा  क्रमांक मिळविला आहे.

“अ” प्रभागातून राष्ट्रतेज गणेश मंडळ काळभोरनगर, श्री दत्त तरूण मडळ दत्तवाडी, दक्षता तरुण मंडळ रुपीनगर, नागेश्वर मित्र मंडळ आकुर्डी गावठाण आणि आझाद मित्र मंडळ दोपीडी यांनी प्रथम पाच क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहेत. ‘ब’ प्रभागातून आखिल मंडई मित्र मंडळ चिंचवड, श्री चिंतामणी मित्र मंडळ आहेरनगर, वाल्हेकरवाडी, उत्कृष्ठ तरुण मंडळ चिंचवड, रावेत प्राधिकरण, नागरिक समिती रावेत आणि नवजीवन मित्र मंडळ मालन फार्म शेजोरी ताथवडे यांनी क्रमांक मिळविला आहे.

‘क’ प्रभागातून कै. दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ गव्हाणे वस्ती भोसरी, श्री संत सावतामाळी तरुण मंडळ जाधववाडी, नवज्योत गणेश मित्र मंडळ, दिघी रोड भोसरी आणि जय महाराष्ट्र मित्र मंडळ लोंढे आळी भोसरी यांनी क्रमांक मिळविला आहे. ‘ड’ प्रभागातून अमरदिप तरूण मंडळ पिंपरी वाघिरे, डी वॉर्ड फ्रेंण्डस सर्कल पिंपरी, श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ पिंपळेगुरूव, श्रीमंत छत्रपती शिवाजी तरूण मित्र मंडळ संतोषनगर, थेरगाव आणि सिझन ग्रुप ऑफसोशल वेलफेअर ट्रस्ट, जुनी सांगवी यांनी क्रमांक मिळविला.

उपक्रमशिल मंडळामधून नवनाथ तरुण मंडळ वाकड, लांडगे लिंबाची तालिम मंडळ भोसरी, जय बजरंग मित्र मंडळ आहेरवाडी चिखली, आणि छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळ भोसरी यांनी क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे, जिवंत देखाव्यात हनुमान तरुण मित्र मंडळ विकासनगर बिजलीनगर, युवा प्रतिष्ठान चिंचवड, जय महाराष्ट्र मित्र मंडळ दत्तनगर थेरगाव, आनंदपार्क मित्र मंडळ थेरगाव, सम्राट मित्र मंडळ थेरगाव, आनंदनगर मित्र मंडळ जुनी सांगवी, विशाल मित्र मंडळ थेरगाव, राजमुद्रा प्रतिष्ठान मोरेवस्ती चिखली, वीर अभिमन्यू फ्रेंडस सर्कल साने चौक चिखली, श्री हनुमान व्यायाम मंडळ चिखली, त्रिमुर्ती मित्र मंडळ रामनगर, शिवशक्ती मित्र मंडळ, आकुर्डी गावठाण, स्वराज्य मित्र मंडळ संत तुकाराम नगर, श्री साईनाथ तरुण मंडळ टेल्को रोड, चिंचवड आणि सिंधुनगर युवकमित्र मंडळ सिंधुनगर प्राधिकरण यांनी क्रमांक मिळविला.

स्थिर हलत्या देखाव्यामध्ये गणेश मित्र मंडळ पिंपळेनिलख, हनुमान तरुण मित्र मंडळ पागेची तालीम चिंचवड, लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ, चिंचवड, श्री शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ विकासनगर, किवळे, अनंतनगर तरुण मित्र मंडळ पिंपळेगुरूव, जागृती मित्र मंडळ, आदर्शनगऱ, जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ ट्रस्ट कासारवाडी, हनुमान मित्र मंडळ काळभोरनगर, भोजेश्वर मित्र मंडळ भोसरी, श्रीराम मित्र मंडळ भोसरी, श्री गणेश मित्र मंडळ भोसरी, हिंदवी स्वराज्य  युवा मंच चिखली, भारतमाता तरुण मंडळ खराळवाडी आणि सेवा विकास मित्र मंडळ संत तुकारामनगर, सिद्धीविनायक प्रतिष्ठान संत तुकारामनगर, नवयुग मित्र मंडळ, रुपीनगर, यशस्वी मित्र मंडळ चिंचवड, नरवीर तानाजी तरुण मंडळ भोसरी, नवमहाराष्ट्र तरूण मंडळ भोसरी आणि नवसम्राट तरुण मंडळ दापोडी यांनी क्रमांक मिळविला.

उल्लेखनिय कामगिरीमध्ये ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ काळेवाडी, नवी सांगवी विभागिय मित्र मंडळ नवी सांगवी, जय महाराष्ट्र मित्र मंडळ लक्ष्मणनगर थेरगाव, आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब, पिंपरी, मोरया कॉलनी तिरंगा मित्र मंडळ काळेवाडी, गणराज मित्र मंडळ जुनी सांगवी, मुळानगर तरुण मित्र मंडळ जुनी सांगवी, श्री शिवाजी मित्र मंडळ विशालनगर पिंपळेनिलख, सावतामाळी मित्र मंडळ जाधववाडी चिखली, जाणताराजा ग्रुप कासारवाडी, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ निगडी प्राधिकरण, श्री तुळजामाता मित्र मंडळ आकुर्डी, आदर्श मित्र मंडळ संत तुकारामनगर, स्वराज्य प्रतिष्ठाण पिंपरी, सुदर्शन स्पोर्टस क्लब मित्र मंडळ खराळवाडी,  नवचैतन्य मित्र मंडळ चिखली, आदर्श मित्र मंडळ भोसरी, श्री भैरवनाथ तरुण मित्र मंडळ कुदळवाडी आणि आझाद मित्र मंडळ कासारवाडी यांनी क्रमांक मिळविला.

आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये मधुबन मित्र मंडळ जुनी सांगवी, अमर तरुण मंडळ पुनावळे, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, वाकड, राही माई प्रतिष्ठाण शिव मित्र मंडळ जुनी सांगवी आणि साई राज मित्र मंडळ पिंपळेगुरुव यांनी क्रमांक मिळविला. वैज्ञानिक देखाव्यामध्ये शुभम युवकमित्र मंडळ आकुर्डी यांनी क्रमांक मिळविला. तर सौसायटीतील आदित्य टेरेस हौसिंग सोसायटी रावेत प्राधिकरण, अॅक्वाब्लू बी हौसिंग सोसायटी शिंदेवस्ती रावेत, भोंडवे एम्पायर रावेत, सार्थक सोसायटी जुनी सांगवी आणि जयराज रेसिडेंशी गणेशोत्सव मंडळ जुनी सांगवी यांनी क्रमांक मिळविला.