दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ प्रथम

253

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डी गावठाण येथील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेचा निकाल आज (सोमवार) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना गुरूवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रोख बक्षिस आणि पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.