थोडे थांबा, भारतात कोरोनाचा महाउद्रेक होणार – फेब्रुवारी २०२१ मध्ये रोज २.८७ लाख केसेस

160

नवी दिल्ली,दि. ८ (पीसीबी) – लोकसंख्येच्या तुलनेत अन्य देशांकडे पाहता भारतात कोरोना तसा आटोक्यात आहे. मात्र, कोरोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात कोरोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. एमआयटीकडून करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार कोरोनाबाधित रुग्णांचा नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात कोरोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असं सागंण्यात आलं आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.

एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास २०२१ मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान असेल.

या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे.

हा अभ्यास करताना तीन मुख्य गोष्टींचा आधार घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे सध्याचं टेस्टिंगचं प्रमाण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, दुसरी म्हणजे जर १ जुलै २०२० पासून टेस्टिंगमध्ये दिवसाला ०.१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तिसरा आधार म्हणजे जर टेस्टिंग चालू स्तरावर कायम ठेवली परंतु संपर्क दर 8 वर गेला तर… म्हणजे एका व्यक्तीमुळे आठ लोकांना संसर्ग होणे.

या मॉडेलमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर आणि आक्रमकपणे टेस्टिंग करण्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. उशिरा टेस्टिंग करणं आणि कमी वेगाने करणं धोकादायक ठरु शकतं असंही सांगण्यात आलं आहे. टेस्टिंगमध्ये दिवसाला ०.१ टक्क्यांनी वाढ केल्यास रुग्णसंख्या कमी होत जाईल असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे एमआयटीने जगभरातील कोरोनाबाधितांसंबंधीची आकडेवारी योग्यपणे दिली नसल्याचं म्हटलं आहे. “जगभरात एकूण ८ कोटी ८५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून १८ जून २०२० पर्यंत एकूण सहा लाख मृत्यू झाल्याचा आमचा अंदाज आहे,” असा दावा करण्यात आला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, १८ जूनपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटी २४ लाख असून ४ लाख ५४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील आजचे वास्तव, रोज सरासरी ४७५ मृत्यू

भारतात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख ४ हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या २० हजार ६४२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या करोनाचे २ लाख ६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारतात एक लाख लोकसंख्येमागे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ इतके आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इराण, मेक्सिको, ब्राझील, पेरू, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे १३७, २३५, ३०२, ३१५, ३९१, ४५६, ५७६, ६०७ आणि ६५१ मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाखामागे ५०५ करोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी १४५३ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण चिलीमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे १५,४५९, पेरूमध्ये ९,०७० तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ८५६०, ७४१९, ५३५८, ४७१४, ४२०४, ३९९६ आणि १९५५ इतके लोक करोना बाधित झाले.

WhatsAppShare