थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने परिसर विद्रूपीकरणाविरोधात स्वच्छता मोहीम

114

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील झाडांवर, विद्युत खांबावर, भिंतीवर चिकटविण्यात आलेली जाहिरातीची पत्रके काढून विद्रुप झालेला परिसर चकाचक करण्यात आला. तसेच झाडांवर फलक लावण्यासाठी मारलेले खिळे काढण्यात आले.  

ही मोहीम आज (रविवार) पडवळनगर, भोरडेनगर, साईनाथनगर, शिवतीर्थनगर येथील अंतर्गत कॉलनीत राबविण्यात आली. यावेळी परिसर विद्रूपीकरणच्या विरोधात वॉक घेण्यात आला. अनधिकृत पोस्टर्स, झाडावरील खिळे, गार्ड, लाइट डिपी, स्ट्रीट लाईट पोल वरील स्टिकर्स काडून थेरगावचे  सुशोभीकरण करण्यासाठी हातभार लावला.