थेरगाव सोशल फाऊंडेशनचे अनोखे रक्षाबंधन; पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन साजरे

115

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्राची लाईफलाईन लालपरी म्हणजेच एसटी व पुणे, पिंपरी-चिंचवडशहराची निळी परी म्हणजेच पीएमपीएमपील बसला राखी बांधून तिच्या संरक्षणाची जवाबदारी घेत काल (रविवारी) थेरगांव सोशल फाउंडेशनने एका अनोखे पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली.

महाराष्ट्राची लाईफलाईन लालपरी म्हणजेच एसटी बस समजली जाते. तर पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची निळी परी म्हणून पीएमपी बसकडे पाहिले जाते. परंतू, समाजात कधी तेढ निर्माण होते, दंगली होतात, तेव्हा प्रथम टार्गेट हे या बसला केले जाते. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने काल (रविवारी) अनोखे पाऊल उचलण्यात आले आहे. थेरगावमध्ये तिच्या रक्षणाची जवाबदारीची शपथ घेतली असून डांगे चौकात मोठ्या उत्साहात हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.