थेरगावात हुंड्यात बियर बार आणावा म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

1085

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – हुंड्यात बियर बार किंवा आईच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा आणावा म्हणून पती आणि सासरकडच्या मंडळींनी विवाहित महिलेचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना थेरगावातील जयहिंद कॉलणी, मारुती मंदिराशेजारी येथील सासरच्या घरात डीसेंबर २०१५ ते जुलै २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पिडीत २१ वर्षीय विवाहित महिलेने सासरकडच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी त्यानुसार पती पवनकुमार घनवट, सासु संध्या घनवट, सासरे गोपाळ घटनवट (सर्व रा. इंद्रेश्र्वरनगर एरिगेशन कॉलणी, एमएमईबी बोर्डचे समोर इंदापुर)  या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २१ वर्षीय तरुणीचा आरोपी पवनकुमार घटनवट याच्यासोबत २०१५ मध्ये विवाह झाला होता. यावेळी पिडीत तरुणी सासरी नांनदत असताना पती पवनकुमार,  सासु संध्या घनवट आणि सासरे गोपाळ घटनवट यांनी मिळून पिडीतेला वारंवार छळ करुन हुंड्यात बियर बार किंवा आईच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा आणावा म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच रात्री अपरात्री घराबाहेर काढून त्याच्या मुलाला स्वतःकडे ठेऊन घेतले आहे. पोलिसांनी घनवटे कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.