थेरगावात विवाहीतेची आत्महत्या; पतीसह सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल

531

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पतीसह सासरकडच्या मंडळींकडून होणाऱ्या नाहक त्रासाला कंटाळून एका विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २००३ ते जुलै २०१८ दरम्यान थेरगावातील बोराटेनगर येथील घरात पती आणि सासरकडच्या मंडळींकडून विवाहीतेचा छळ झाला होता.

रेश्मा हारुन शेख (वय ३५) असे आत्महत्या केले विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ अमजद शेख (वय ३२, रा. पिंपळे गुरव) याने पती होरुन हसन शेख आणि सासरकडच्या मंडळींविरोधात वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा शेख हीचा २००३ मध्ये होरुन शेख याच्या सोबत विवाह झाला होता. ती तिच्या पती आणि सासरकडच्या मंडळींसोबत थेरगावातील बोराटेनगर येथे राहत होती. यावेळी पती होरुन कडून घेतला जाणारा चारित्र्यावर संशय, सासरकडच्या मंडळींकडून वारंवार घरघुती कारणावरुन दिला जाणारा शारिरीक व मानसिक त्रास याला कंटाळून रेश्माने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा भाऊ  अमजद शेख याने पती होरुन आणि सासरकडच्या मंडळींविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक एस.बी.बाबरवाकड तपास करत आहेत.