थेरगावात मुलगा घरात सापडला नाही म्हणून कुऱ्हाडीने आईला मारहाण

903

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) –  पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघा जणांनी घरात घुसून एका तरुणाच्या आईला कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच तो जीथे भेटेल तीथे त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.१) रात्री साडेबाराच्या सुमारास संत ज्ञानेश्र्वर कॉलणी, धनगर बाबा मंदिराच्यामागे, थेरगाव येथे घडली.

संध्या संजु गायक (वय ४०, रा. संत ज्ञानेश्र्वर कॉलणी, धनगर बाबा मंदिराच्यामागे, थेरगाव) असे कुऱ्हाडीने मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनिल वामन ससाने (रा. वैभव बंगला, किनारा कॉलणी ए, विजयनगर काळेवाडी) आणि त्याचा साथीदार (नाव पत्ता कळू शकले नाही) या दोघांविरोधात  वाकड पोलीस ठाण्यात तक्रारा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संध्या गायके यांचा मुलगा सचिन आणि आरोपी अनिल यांच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन अनिल हा त्यांच्या साथीदारासोबत शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सचिनच्या थेरगावातील घरात घुसला. सचिन घरात नसल्याने अनिल याने कुऱ्हाडीने सचिन याची आई संध्या यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेमध्ये संध्या या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी अनिल आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करत आहेत.