थेरगावात पोलिसांना माहिती दिल्याने टोळक्यांकडून महिलेला जीवेमारण्याची धमकी

376

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – घरा शेजारील मोकळ्या जागेत दारु पिण्यास बसल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्यांची महिलेच्या घरात घुसून तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शनिवार (दि.२९) रात्री साडेदहाच्या सुमारास थेगावात घडली.

याप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार सहा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सहा जण थेरगाव येथे राहत असलेल्या ३९ वर्षीय महिलेच्या घरा शेजारील मोकळ्या जागेत दारु पीत होते. यावेळी महिलेने याची माहिती पोलिसांना दिली. टोळक्यांना याची खबर लागली. यावर सहा जणांच्या टोळक्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करुन महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.आर.स्वामी तपास करत आहेत.