थेरगावात पतिच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीची आत्महत्या

384

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – पतिचे पर स्त्रीसोबत असलेले अनैतिक संबंधांना व सत्तचा दिला जाणाऱ्या त्रासाला वैतागून पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना थेरगावातील लोखंडेचाळ येथे घडली.
प्रतिक्षा पाचपिंडे असे आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती पंकज रतन पाचपिंडे आणि त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज पाचपिंडे याचे एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे तो सत्त पत्नी प्रतिक्षा हिला शारीरीक व मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून प्रतिक्षाने राहत्या घरी आत्महत्या केली. थेरगाव पोलिस तपास करत आहेत.