थेरगावात गावठी कट्टयासह एकाला अटक

540

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या एका इसमाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज (शुक्रवारी) थेरगावमधील शनी मंदिराजवळ करण्यात आली.

रेहमत बरकतअली सिद्दीकी (वय ४८, रा. थोरात यांची चाळ, रूम नंबर चार, बालाजी कॉलनी, थेरगाव. मूळ रा. गाव. महुआमाधव, ता. उतरवला, जि. बल्लामपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) थेरगावातील पुणेरी स्वीटजवळील असलेल्या मैदानात शनी मंदिराजवळ एक इसम गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून रेहमत सिद्दीकीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला १५ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून रेहमत सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा विकण्यासाठी आणला असल्याचे कबुल केले. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

WhatsAppShare