थेरगावातील पालिकेच्या फिरते शौचालयाचे १४ दरवाजे चोरट्यांनी पळवले

116

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – थेरगावातील पालिकेच्या फिरते शौचालयाचे १४ दरवाजे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले आहेत. याप्रकरणी शेखर निंबाळकर (वय ४१, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.४) ते सोमवार (दि.६) दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी थेरगावातील जगताप नगर येथे असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या ग आणि ड क्षेत्रीय कार्यालयाच्या फिरते शौचालयाचे एकूण २८ हजार रुपये किमतीचे १४ लोखंडी दरवाजे चोरु नेले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.