थेरगावातील डांगे चौकात बाल वारकऱ्यांकडून दिंडीद्वारे समाजजागृती

354

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – आषाढी वारीचे औचित्य साधून थेरगाव, डांगे चौक येथील लिटल चॅम्पस् प्ले ग्रुप अॅण्ड नर्सरी स्कूलच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात दिंडी काढली. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते.

डांगे चौक ते गणेश मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. विठ्ठल, रखुमाईच्या पेहरावामध्ये अनेक चिमुकले वारकऱ्यांच्या वेषात नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दिंडी काढलेल्या बाल वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी तसेच प्लास्टिक मुक्त स्वच्छ भारत आणि मुलगा मुलगी एक समान असे समाज प्रबोधनपर फलक घेवून जनजागृती केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया भोईर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.