थेरगावमध्ये शंभर रुपयांसाठी तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

514

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) –  शंभर रुपये परत केले नाही म्हणून एका दुकानदाराच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवार (दि.९) रात्री साडेअकराच्या सुमारास थेरगाव येथील पडवळनगरमध्ये घडली.

श्रीधर लक्ष्मणराव महेद्रकर (वय २८, रा. रहिमाणीया मस्जीद जवळ, पडवळनगर, थेरगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार अशोक महादेव जाधव (वय २०, रा. कोकणेनगर, काळेवाडी) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीधर याचे काळेवाडी फाटा येथे दुकान आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास आरोपी अशोक याने तू माझे १०० रुपये का दिले नाही असे बोलून श्रीधरच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारु त्याला गंभीर जखमी केले. वाकड पोलिसांनी आरोपी अशोक याला अटक केली आहे. सहाय्यक फौजदार ए.ए.मोमीण तपास करत आहेत.