आपल्या आईला आजारपणामुळे होणाऱ्या वेदना मुलाला बगवेनात म्हणून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना थेरगावमध्ये बुधवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

गौतम चंद्रकांत ठोसर (वय २४, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम ठोसर हा आई आणि त्याच्या मोठ्या भावासह थेरगावमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहात होता. बुधवारी दुपारी मोठा भाऊ घरी आला मात्र, दरवाजा ठोठावला तरी आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो परत निघून गेला.  रात्री गौतमचा भाऊ पुन्हा घरी आला त्यावेळी देखील असच झाले त्याने मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि दरवाजा तोडला तेव्हा लहान भाऊ गौतम ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आले.  काही दिवसांपासून आई आजारी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याच नैराश्यातून गौतम ठोसर ने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.