थेरगांव येथील गोदामातील प्लॅस्टीक पाईपला भीषण आग

69

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – थेरगांव येथील गोदामातील प्लॅस्टीक पाईपला भीषण आग लागली. ही आग आज (बुधवार) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास लागली. आगीने रौद्ररूप धारण केले असून धुराचे लोट निघत आहेत.

थेरगांवातील अनुसया मंगल कार्यालयाजवळ पाईपचे गोदाम आहे. या गोदामातील पाईपना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत.

गोदामाजवळ असलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.