थुंकण्याच्या नादात जलद लोकलमधून पडून दोन तरुणांचा मृत्यू

175

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – जलद लोकलमधून थुंकण्याचा नादात तोल गेल्याने खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईच्या सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानका जवळ घडली.

सरफराज समीर खान आणि अमन सय्यद असे लोकमल मधून पडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज खान आणि अमन सय्यद मुंब्र्याहून सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करत होते. दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यात दर्शनासाठी त्यांना जायचे होते. मुंब्रा येथून त्यांनी स्लो लोकल पकडली होती. घाटकोपर स्थानकावर उतरुन त्यांनी सीएसटीएमला येणारी फास्ट लोकल पकडली. सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर सरफराज थुंकण्यासाठी लोकलबाहेर झुकला असता त्याचा तोल गेला आणि खाली पडला. यावेळी अमन दरवाजात उभा होता. सरफराजसोबत त्याचाही तोल गेला. या दुर्घटनेत सरफराज जागीच ठार झाला, तर अमन गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.