थायलंडमध्ये ‘एनाबेल कम्स होम’ हा हॉरर चित्रपट पाहत असताना वृध्दाचा चित्रपट गृहातच मृत्यू

125

थायलंड, दि. ९ (पीसीबी) – हॉरर चित्रपट ‘एनाबेल कम्स होम’ पाहत असताना चित्रपट गृहातच एका ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही हैराण आणि घाबरवून टाकणारी घटना थायलंडमध्ये घडली.

बर्नार्ड चैनिंग (वय ७७, रा. इंग्लेंड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. ते व्हॅकेशनसाठी थायलंडला गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बर्नार्ड व्हॅकेशनसाठी थायलंडला गेले होते. तेथे ते एनाबेल कम्स होम हा हॉरर चित्रपट पहायला चित्रपट गृहात गेले होते. जेव्हा सिनेमा संपला तेव्हा लाइट्स लागल्या. तर त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलेने पाहिले की बर्नार्ड यांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा महिलेने बर्नार्ड यांना पाहिले तेव्हा ती मोठ्याने किंचाळली.  तिने आपातकालीन सेवाला कॉल केला. ते लोक आल्यावर त्यांनी बर्नार्ड यांचे पार्थिव झाकल आणि अॅम्ब्युलन्स बोलवली. कुणालाही समजल नाही की चित्रपटादरम्यान बर्नार्डचा मृत्यू कसा आणि कधी झाला. स्थानिक पोलिसांना देखील या प्रकरणाबद्दल कळवण्यात आले. या घटनेनंतर महिलेला धक्का बसला आहे. बर्नार्ड मृत्यू एनाबेल सिनेमामुळे झाला कि आणखी काही कारणामुळे हे अद्याप समजू शकले नाही. थायलंड पोलिस तपास करत आहेत.