थरारक: जुन्नरमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दुकानदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

161

जुन्नर, दि. १५ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोन तरुणांनी एका दुकानदाराला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात घडली.

रशीदभाई तांबोळी असे साठ टक्के भाजलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हृषिकेश लोखंडे आणि किरण जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशीदभाई यांचे मांजरवाडी येथे किराणामालाचे दुकान आहे. त्यालागत काही दिवसांपूर्वी रस्त्याच काम सुरु होते. रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर तो सामंजस्याने मिटला खरा पण हृषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना होती. त्यांनी मंगळवारी मध्यरात्री रशीदभाई यांना फोन करुन दुकानातून सिगरेट आणि माचिस देण्याची बहाण्याने बाहेर बोलावले. ते बाहेर येताच त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून माचिसने पेटवले. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा बाहेर झोपलेल्या काही ग्रामस्थांना जाग आली. रशीदभाई यांना लागलेली आग त्यांनी विझवली आणि रुग्णालयात दाखल केले. नारायणगाव पोलिसांनी हृषिकेश आणि किरणला अटक केली आहे.