‘त्या’ व्हायरसचा सातारा जिल्ह्याला अजिबात धोका नाही

55

सातारा,दि.२३(पीसीबी) – महाबळेश्वर येथील दोन वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून आला मात्र याचा नागरिकांना धोका नसल्याने काळजी करण्याचे कारण नसून नागरिकांनी झाडाखालील पक्षांनी खाल्लेली फळे न खाण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. निपाह व्हायरसचा सातारा जिल्ह्याला धोका नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज(मंगळवार) साताऱ्यात सांगितले आहे.

तर, मागील २० वर्षे वटवाघुळांवर संशोधन करत असलेल्या डॉ.महेश गायकवाड यांनी महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह वायरसचे खंडण केले आहे. निपाह व्हायरस बहुतांश इंडोनिशिया, मलेशिया आणि नॉर्थ ईस्ट या भागात आढळतो मात्र आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही वटवाघळात निपाह वायरस आढळला नसल्याचा दावा, त्यांनी केला असून नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, अशा रिपोर्ट्समुळे वन्य जिवांवर घातक असे उपाय केले जातात. वन्यजीव संपल्यास अनेक वायरस मनुष्यांपर्यंत पोहचण्याचा धोका देखील डॉ.महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह’ विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.

मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. महाबळेश्वराच्या गुहेत सापडलेला वटवाघुळाच्या तपासणीत हा व्हायरस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासात माहिती समोर आली आहे. महाबळेश्वरमध्ये घेतलेल्या नमुन्यामध्ये निपाह व्हायरस आढळला आहे. यामुळे श्वसनाचा त्रास होऊन मेंदूला सूज येवून मृत्यू होतो. अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांना सांगितलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो.

निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. करोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता एक ते दोन टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ६५ ते १०० टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.

WhatsAppShare