‘त्या’ मध्यरात्री बिबवेवाडीत सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

115

पुणे, दि. १5 (पीसीबी) : पुण्याच्या बिबेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खुन करण्यात आला आहे. शहरात रात्रीची संचारबंदी असतानाही अशा प्रकारे एका टोळक्याने हा खून केल्यामुळे पोलिसांच्या नाकाबंदी वर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 10 जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत माधव वाघाटे हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने एका मित्राला फोन करून माझे भांडण झाले असून बिबवेवाडीतील ओटा स्कीमजवळ असल्याचे सांगितले होते. दरम्यान माधव हा एका मित्रासह थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, बांबू व ट्यूब लाईट यासारख्या हत्यारांनी त्याच्या तोंडावर, डोक्यात वार केले. त्यानंतर हे टोळके पसार झाले. गंभीर जखमी झाल्याने यामध्ये माधव वाघाटे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

WhatsAppShare