‘त्या’ दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

54

मुंबई, दि. १० (पीसीबी) : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मालाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. यात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेने मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यातील दहा जण हे रफी यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. ज्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. मोहम्मद हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण ते दूध घेऊन परतल्यानंतर होत्याचं नव्हतं झालेलं पाहून त्यांच्या काळजात धस्स झालं.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.

या भागात राहणाऱ्या सिद्दीकी नावाच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मी पाऊस थांबल्याने रात्री 10.15 च्या सुमारास घराबाहेर आलो. त्यावेळी दोघांनी आम्हाला घराबाहेर पडा असे सांगितले. त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेचच घराबाहेर पडलो. मी बाहेर पडलो आणि पाहताक्षणी आमच्या इमारतीच्या डेअरी जवळील तीन इमारत या पत्त्याप्रमाणे कोसळल्या, असे ते म्हणाले.

तर शाहनवाज खान या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

WhatsAppShare