‘त्या’ दिवशी नेमकी घराच्या मागील बाजूस दुचाकी पार्क केली; सकाळी पाहतो तर काय ?

60

चाकण, दि. २८ (पीसीबी) – खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी ते चोरुन नेली. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत 27 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर वसंत नवघणे (वय 38, रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शंकर यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 18 / बी एन 3340) 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घराच्या मागील बाजूस पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. 20 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare