`त्या` अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, ठेकेदाराला काळ्या यादित टाका – – महापौर, उपमाहापौर, सत्ताधारी नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांची एकमुखी मागणी

43

पिंपरी,दि. 22 (पीसीबी) – वैद्यकीय विभागातील खरेदी व्यवहारात बँक खात्यात लाच स्विकारल्याचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने महापालिकेतील महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर कक्षात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या संबंधीत तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवा आणि ज्या ठेकेदाराने लाचेची रक्कम बँक खात्यात जमा केली त्यालाही काळ्या यादित टाका, अशी मागणी केली.

पत्रकारांशी बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नगरसेवक तुषार हिंगे यांनी ज्या प्रकरणात आरोप केले आहेत, त्यावर आयुक्तांनी समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. चौकशी अहवालानुसार कारवाई होईलच पण दरम्यानच्या काळात संबंधीत अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजवर पाठवावे. खरे तर, पुरावे दिले असताना तातडिने कारवाई केली पाहिजे होती. ठेकेदाराच्या टॅक्स ऑडिट रिपोर्टमध्ये कोणाला किती पैसे दिले ते अगदी स्पष्ट दिसते आहे. दोन -तीन लाख रुपये संबंधीत अधाकाऱ्यांच्या खात्यावर जमा दिसतात. यापेक्षा वेगळा पुरावा काय पाहिजे. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे या मताशी भारतीय जनता पक्ष पूर्ण सहमत आहे. महापालिकेतील कोणत्याही भ्रष्टाचाराला अथवा भ्रष्टाचार कऱणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. भ्रष्टाचार कदापी खपवून घेणार नाही, अशी सत्ताधारी भाजपची स्पष्ट भूमिका कायम आहे. त्याशिवाय ज्या ठेकेदाराने अशा प्रकारे व्यवहार केले आहेत त्या ठेकेदारालाही तत्काळ काळ्या यादित टाकावे अशी आमची मागणी आहे.

भाजपची मोठी बदनामी –
सत्ताधारी भाजप विरोधात असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक वेळोवेळी आरोप करत असतात. यावेळी भाजपच्या नगरसेवकाने गंभीर आरोप केले. त्यात पक्षाची मोठी बदनामी झाली. वायसी एम मदील लॅप्रोस्कोपी खरेदी प्रकऱणात ५० लाखाची खरेदी दीड कोटींवर कशी गेली याचे उत्तर प्रशासन देत नाही. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रसच्या काळात एचबीओटी मशिन ७० लाख रुपयांचे ३ कोटींना खरेदी केले होते. त्यावर भाजपने मोठे आरोप केले आणि तीन वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई झाली, मात्र भाजप सत्तेवर येताच संबंधीत ठेकेदाराचे अडवून ठेवलेले सर्व पेमेंट न्यायालयाच्या आदेशानुसार चुकते करण्यात आले. पाच वर्षांपासून हे ३ कोटींचे मशिन धूळ खात पडून आहे.

WhatsAppShare