“…त्यासाठी चोरले चक्क ब्लाउज पीस आणि साड्या”

1

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी फेज तीन येथील फाउंटन मार्केट मधील टेलरिंगचे एक दुकान फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह चक्क ब्लाउज पीस आणि साड्या चोरून नेल्या आहेत.

आयुब बाबूजान शेख (वय 25, रा. गवारवाडी, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन मध्ये फाउंटन मार्केट मध्ये शाम फॅशन ड्युटी नावाचे टेलर दुकान आहे. सोमवारी (दि. 21) रात्री नऊ वाजता त्यांनी त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा कडी कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी ब्लाउज पीस, साड्या आणि रोख रक्कम असा एकूण 66 हजारांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare