…त्यामुळे निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये

87

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – ‘दिल्ली विधानसभा निवडणुकांत आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचे काहीही योगदान नाही, त्यामुळे या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये,‘ अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचा प्रयत्न करू नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावले.