…त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल – शरद पवार

115

कोल्हापूर,दि.१४(पीसीबी) – तुम्ही एसटी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवा. त्या बैठकीला मलाही बोलवा. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एसटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत. यातील उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शब्दाबाहेर नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५६ व्या राज्यव्यापी अधिवेशनात शरद पवारांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.