त्याने भाडेतत्वावर गाड्या घेतल्या पण परत दिल्याच नाही मग झाले असं काही

84

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – गाड्या भाडेतत्वावर घेतो असे सांगून एकाने दोन गाड्या घेतल्या. घेतलेल्या गाड्या परत न देता त्यांचा अपहार केला. ही घटना 1 फेब्रुवारी 2021 ते 4 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सद्गुरूनगर, भोसरी येथे घडली.

गणेश किसन खांदवे (वय 35, रा. सांगवी ता. वडगाव मावळ, जिल्हा पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सौरभ बसवराज पाटील (वय 26 रा. गणराज कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी बुधवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश खांदवे याने दरमहा 20 हजार रुपये भाडे देतो असे सांगून फिर्यादी यांची साडेचार लाख रुपये किंमतीची (एम एच 14 / एच जी 6106) आणि दोन लाख 40 हजार रुपये किंमतीची (एम एच 12 / एफ एफ 3535) या दोन गाड्या भाडेतत्वावर घेतल्या. मात्र फिर्यादी यांनी वारंवार त्यांच्या गाड्या परत करण्याची मागणी करूनही आरोपीने गाड्या परत दिल्या नाहीत. गाड्यांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare