तो बँकेत काही कामानिमित्त आला मात्र घडलं वेगळंच काही

76

दिघी, दि. २३ (पीसीबी) – बँकेमध्ये आलेल्या एका तरुणाचा मोबाईल फोन एका व्यक्तीने चोरला. याप्रकरणी मोबाइल चोरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च-होली फाटा येथे घडली.

तानाजी शहाजी तांबे (वय 40, रा. वडमुखवाडी, च-होली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत दत्ता दुंदा सातपुते (वय 23 रा. देहूफाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातपुते गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास च-होली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कामानिमित्त आले. त्यावेळी आरोपीने त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare