….तोपर्यंत योग्य उत्तर मिळाले नाही, तर बँक फोडून टाकेन, – खासदार नवनीत राणा

214

अमरावती,दि.२८ (पीसीबी) – अमरावतीच्या नवनीत राणा मेळघाटाच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी असलेल्या चुर्णी गावातील अलाहावाद बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी तेथील आदिवासींना त्रास देत असल्याच्या तक्रारी त्यांच्या कानावर येत होत्या. या तक्रारींची दखल घेत त्या आज गावातील बँकेच्या शाखेत पोहोचल्या.

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत कौर राणा अलाहाबाद बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. ३० हजार ग्राहक असतानाही फक्त तीन कर्मचारी असल्यामुळे बँकेबाहेर दररोज रांगा लागतात. काहींचे कामे पूर्ण होतात तर काहींना बँकेतून रिकाम्या हाताने जावे लागते. नवनीत राणा यांनी सोमवारी बँक कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. नवनीत राणा यांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. ‘पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळाले नाही, तर बँक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, अन्यथा मोठे आंदोलन करू असा सज्जड दम यावी त्यांनी दिला. त्या म्हणाल्या की, कोणताही व्यक्ती कितीवेळ रांगेत उभा राहू शकतो? इथे अनेक वयोवृद्ध लोक बँकेबाहेर रांगेत उभे असतात. काहीना आपली कामं सोडून बँकेत रांगेत उभे राहावे लागेते. तरीही कामे होते नाहीत. लवकरात लवकर आणखी कर्मचाऱ्यांची भरती करा असे ही नवनीत राणा म्हणाल्या. अखेरीस संध्याकाळी पाच वाचाता बँकेकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी आपले आंदोलन मागे घातले.

 

 

 

WhatsAppShare