…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही – पंकजा मुंडे

234

बीड, दि. १२ (पीसीबी) – बीडमधील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निर्धार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीमध्ये झालेल्या जाहीर सभेत केला आहे.

आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत असताना पंकजा यांनी फेट्याबद्दलच्या निश्चयाचा पुनरुच्चार केला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टिका केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नमिता मुंदडा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रचारादरम्यान असाच निश्चय व्यक्त केला होता. केज आणि परळीचा आमदार राष्ट्रवादीचा होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असे कोल्हे म्हणाले होते. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नमिता मुंदडा या राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत.

WhatsAppShare