ते रिक्षातून प्रवासी घेऊन जात होते आणि तेवढ्यातच…

132

निगडी, दि. १२ (पीसीबी) – निगडी मधील ट्रान्सपोर्टनगर येथे प्रवाशाने रिक्षाचालकाला लुटल्याची घटना 29 मार्च रोजी रात्री घडली. याबाबत 11 मी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बाबू गायकवाड (वय 27, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे रिक्षाचालक आहेत 29 मार्च रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ते ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथून एका प्रवाशाला घेऊन जात होते. रायगड हाॅटेल जवळ रिक्षा आल्यानंतर रिक्षातील प्रवाशाने लघु शंकेचा बहाणा करून रीक्षा थांबवण्यास सांगितले. त्यानंतर प्रवाशाने फिर्यादी यांच्या खिशातून 27 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरूला. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन साथीदारांसोबत प्रवासी पळून गेल निगडी पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare