ते म्हणजे आयत्या बिळावर चंदूबा

227

पुणे, दि. १८ (पीसीबी) – कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर   राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून मराठी म्हणीचे नवे अर्थ या मथळ्याखाली एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधत ते पाटील जे करत आहेत ते म्हणजे आयत्या बिळावर चंदूबा, असे म्हटले आहे.

कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांना रोखण्यासाठी  राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा जाहीर केला आहे. तर या निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ ची चंपी करणार,  अशी खोचक टीका  राज ठाकरे यांनी केली होती.

कोल्हापूर सांगली या दोन शहरांमध्ये पूर आला आणि सरकारमधला मंत्री वाहून कोथरुडमध्ये आला, असे म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. ‘चंपा’ हे नाव पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांचे ठेवले हे कळल्यावर पुणेकर नावे ठेवण्यात पटाईत आहेत, असेही राज ठाकरेंनी म्हटले होते.

WhatsAppShare