‘ते मंदिरात दर्शनासाठी गेले होते आणि तेवढ्यात जे झाले त्याचा त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता’

42

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला राॅड, बांबू आणि फरशीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 3) दुपारी झुलेलाल मंदिरासमोर पिंपरी येथे घडली.

नवीन मुकेश बेद (रा. सुभाषनगर, पिंपरी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी बेहनवाल (वय 30), दिनेश बेहनवाल (वय 19), धनवंत बेहनवाल (वय 33, सर्व रा. सुभाषनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवीन सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेरील रस्त्यावर आले असता आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रवी याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपी दिनेश आणि धनवंत या दोघांनी हाताने, लोखंडी रॉडने, बांबूने आणि फरशीने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare