तृतीयपंथी समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरची ‘हिजड़ा हब्बा’ कार्यक्रमाला हजेरी

768

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर सध्या मैदानापासून दूर असला तरी कायम चर्चेत असतो. शानदार फलंदाजीसह आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिकली लावल्याची दिसत आहे.

तृतीयपंथी समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीरने उपस्थिती लावली होती. ‘हिजड़ा हब्बा’ असं या कार्यक्रमाचे नाव होते. गौतम गंभीर इथे पोहोचल्यानंतर त्यावेळी तृतीयपंथीयांनी त्याला त्यांच्याप्रमाणे तयार होण्यास मदत केली आणि या फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे. भेदभावाचा सामना करणाऱ्या तृतीयपंथी समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे कारण समजल्यानंतर सगळ्यांनीच गंभीरचे कौतुक केले.