तृतीयपंथीयांनी त्यांची कार अडवली आणि…घडलं अघटित

129

देहूरोड, दि. ७ (पीसीबी) – तळेगावकडून भोसरीकडे जात असलेल्या एका कार चालकाला तीन तृतीयपंथीयांनी अडवून मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीत घडली. बालिका आबादास भोगे (वय 33), दिया बाबुराव शर्मा (वय 27), राहुल कैलास गायकवाड (वय 22, सर्व रा. पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रुबेन विल्यम ओहोळ (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी ओहोळ त्यांच्या कार मधून (एम एच 47 / वाय 2147) तळेगाव कडून भोसरीकडे जात होते. ते एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीत आले असता आरोपी तीन तृतीयपंथीयांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर फिर्यादी यांना हाताने मारहाण करून त्यांच्याकडील पाचशे रुपये रोख रक्कम आणि 35 हजारांचा सोन्याचा गोफ असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare