तू घराबाहेर निघून जा, आम्ही तुला सांभाळणार नाही; असे म्हणत विवाहितेचा छळ

96

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांचा योग्य मानपान केला नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल 2018 ते 29 मे 2021 या कालावधीत श्रीधरनगर, चिंचवड येथे घडली.

अक्षय संजय देठे (वय 33,) संजय प्रेमचंद देठे (वय 59), अनिता संजय देठे (वय 55, सर्व रा. श्रीधरनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 6) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांना योग्य मानपान दिला नाही. तसेच सासरच्या लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच ‘तू आमच्या घरात राहायचे नाही. तू निघून जा. तुला आम्ही इथे राहू देणार नाही. तू कशी राहते हे पाहतो’, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी पती याने दररोज दारू पिऊन विवाहितेचा शारीरिक छळ केला. ‘तू घराबाहेर निघून जा. आम्ही तुला सांभाळणार नाही’, असे म्हणून मानसिक छळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare