तू काय माझ्या अंगावर गाडी घालतो काय; असे म्हणत टेम्पोची काच फोडली

107

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – परभणी येथून चिंचवड येथील एका कंपनीत माल घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून लुटले. तसेच टेम्पोची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री विद्यानगर झोपडपट्टी येथे सार्वजनिक रोडवर घडली.

ज्ञानदेव रामचंद्र फडतरे (वय 47, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फडतरे हे टेम्पोचालक आहेत. ते मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास परभणी येथून चिंचवडमधील रोहित कृषी इंडस्ट्रीज या कंपनीत माल घेऊन आले. विद्यानगर झोपडपट्टी येथे एका इसमाने फिर्यादी यांचा टेम्पो अडवला. तू काय माझ्या अंगावर गाडी घालतो काय, असे म्हणून फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तसेच टेम्पोची समोरील काच दगड मारून फोडली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare