तूर्तास १८०० कामागारांचा रोजगार वाचला, मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार कऱण्याचे आयुक्तांची ग्वाही

25

यांत्रिकीकरण साफसफाई निविदा रद्द, भाजपच्या जेष्ठ नगरसेविक सिमा सावळे यांनी कंत्राटी कामगारांची बाजू मांडली

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – महापालिकेत रस्त सफाई कामात सद्या १८०० कामगार कार्यरत आहेत. यांत्रिक सफाई पध्दतीने रस्ते सफाई करताना यातील बहुतेकांचा रोजगार जाण्याची भिती होती. भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी त्याबाबत जोरदार हरकत घेतली होती. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यावर गांभीर्याने विचार केल्याने तूर्तास या कामगारांचा रोजगार वाचला आहे. पुन्हा यांत्रिकीकरण सफाईची निविदा काढताना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला जावा असे आयुक्त हार्डीकर यांनी त्यांच्या निर्णयात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व रस्ते यांत्रिक पधअदतीने साफसफाई करायचा निर्णय केला होता. त्यासाठी निविदा प्रक्रीया केली होती. सात-आठ वर्षांसाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या कामात शहरातील बड्या नेत्यांची भागीदारी असल्याचे आरोप झाले होते. कंत्राटी काम करणाऱ्यांचा रोजगार गेला तर १८०० गोरगरीब कामगारांची उपासमार होणार होती. या विरोधात सर्व प्रथम सिमा सावळे यांनी लेखी आक्षेप नोंदविला. त्यानंतर काही कामगार संघटनांनीही निवेदन काढले व आंदोलनाचा इशाराही दिला होता. अशा पध्दतीने यांत्रिकीकरणात १८०० कुटुंबांची उपासमार होणार होती म्हणून सत्ताधारी भाजप बद्दल नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रीया होती.

सिमा सावळे यांनी निविदा प्रक्रीया कशी बेकायदा आहे, असे आयुक्तां समोर झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले होते. त्यावेळी १८०० कामागारांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्यांनी म्हटले होते की, १८०० पैकी सुमारे ११९६ कामगारांची आवश्यकता ऐहो व त्यापैकी सुमारे १०२० स्विपर, ९६ ड्रायव्हर, ४८ ऑपरेटर, ३२ हेल्पर यांचा समावेश आहे. म्हणजेच सद्या कार्यरत १८०० कामगारांपैकी सुमारे ७२० कामगार हे बेरोजगार होणार आहेत. तसेच यांत्रिक पध्दतीने रस्ते साफसफाई करातना दिवसा कामकाज करणे शक्य नसल्याने रात्रीचे १० वाजले पासून सकाळी ६ वाजे पर्यंत कामकाज करणे प्रस्तावित आहे. रस्ते सफाई करणाऱ्या महापालिकेतील १८०० पैकी १४००-१४५० कामगार या महिला आहेत. त्यातही १०-१५ वर्षांपेक्षा जास्त काळ विविध ठेकेदारांकडे कामाला आहेत. या कामगारांचे वय आता ४५ वर्षेपेक्षा जास्त आहे.ठेकेदारी पध्दतीने काम करताना त्यांना किमान वेतन दिले जात नाही व पूर्वी या कामगरांचा भविष्यनिर्वाह निधीसुध्दा देण्यात आलेला नाही. स्वच्छ भारत अभियान राबविण्यापूर्वी मनपा परिसरात मोठ्या प्रमाणात हगणदारी असताना या सर्व कामगारांनी शहर स्वच्छ राखण्यासाठी प्रचंड मेनत घेतली आहे. मात्र आता रात्रपाळीला या महिला कामगारांना ते शक्य होणे कठीण आहे. तसेच त्यांच्या सुऱक्षेचा प्रश्न देखील उदभवू शकतो. या सर्व बाबींचा विचार केला तर हे कामगार बेकार होणार आहेत.

कोरोनाचा संस्रग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, पण या काळात देशात सर्व सफाई कामगार रस्त्यावर होता. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी रस्ते सफाई केली. हे सर्व पाहता या कामगारांचा रोजगार जाणार नाही या दृष्टीकोणातून गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे, असे सिमा सावळे यांनी त्यांच्या युक्तीवादात नमूद केले होते.

WhatsAppShare