तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो?; उमर खालीदचा मोदींवर निशाणा

142

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीवर उमर खालीदने टीका केली आहे. तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो?, असे ट्विट करत खालीदने मोदींवर निशाणा साधला असून पत्रकार परिषदेची ही कोणती पद्धत असा सवालही त्याने विचारला आहे.

अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र, त्यांनी एकाही प्रश्नावर उत्तर दिले नाही. यावरुन मोदींवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उमर खालीदनेही ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला. चेहरे पर पसीना, चुप्पी लबों पे, यह कैसा प्रेस कॉन्फ्रेंस चला रहे हो? असे ट्विट त्याने केले आहे. तुम्ही का इतके घाबरलात ?,असे कोणते पाप आहे की जे तुम्ही लपवत आहात?, असा सवालही त्याने विचारला आहे.

दरम्यान, ही पत्रकार परिषदत मोदी आणि शहा संयुक्तपणे घेतील, अशी चर्चा होती. त्यानुसार मोदी यांना व्यासपीठावर पाहून पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये उत्साह संचारला. सत्तेवर आल्यापासून गेल्या पाच वर्षांतील त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद असल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असल्याने मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देतील अशी अपेक्षा होती, ती मात्र पुन्हा एकदा फोल ठरली.